नगरपालिका कर्मचाऱ्याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून…

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून सोमनाथ मोरे या तरूणाला तिघां जणांनी लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करत हूक गळ्यावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना दिनांक २० फेब्रुवारी रोजी राहुरी शहर हद्दीत घडलीय.

सोमनाथ अर्जून मोरे हा तरूण राहुरी नगरपरिषद मध्ये पाणिपुरवठा विभिगात नोकरी करतो. दिनांक २० फेब्रुवारी रोजी राहुरी शहर हद्दीतील बाजार समितीमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ त्याची ड्यूटी होती.

ड्युटी संपल्यावर तो घरी निघून गेला होता. त्यावेळी त्याचे जर्किंग तेथे विसरून राहिले होते. रात्री साडेदहा वाजे दरम्यान सोमनाथ अर्जून मोरे हा त्याचे जर्किंग घेण्यासाठी पाण्याच्या टाकी जवळ गेला.

त्यावेळी तेथे योगेश बाचकर हा आला. आणि सोमनाथ मोरे याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. त्यावेळी सोमनाथ मोरे याने माझ्याकडे पैसे नाहीत. असे त्याला सांगितले.

याचा राग आल्याने त्याने व त्याच्या बरोबर असलेल्या इतर दोघांनी सोमनाथ मोरे याला लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच गोणी उचलायच्या हूकाने सोमनाथ याच्या गळ्यावर मारून त्याला जखमी केले.

तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. सोमनाथ मोरे याच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सोमनाथ अर्जून मोरे याने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

त्याच्या फिर्यादीवरून योगेश बाचकर, सनी बाचकर, पप्पू बाचकर तिघे राहणार बारागांव नांदूर गावठाण, ता. राहुरी. या तिघांवर मारहाणीचा व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe