अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 34 अर्ज दाखल झाले.(Ashok Sugar Factory)
उमेदवारी अर्ज दाखल करणार्यांमध्ये संचालकासह अशोक कारखान्याचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचाही समावेश आहे.
उद्या शुक्रवार 17 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याचे अर्ज दाखल करणारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशोक कारखाना निवडणुकीसाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले
भानुदास काशिनाथ मुरकुटे (सर्वसाधारण टाकळीभान गट), यशवंत गोविंदराव बनकर (सर्वसाधारण पढेगाव गट), यशवंत दिनकर रणनवरे (अनु. जाती/जमाती), दत्तात्रय कुंडलिक नाईक (सर्वसाधारण टाकळीभान गट),
हिराबाई ज्ञानदेव साळुंके (महिला राखीव), मंजाबापू धोंडीबा थोरात (सर्वसाधारण टाकळीभान गट), ज्ञानेश्वर भिकाजी शिंदे (सर्वसाधारण कारेगाव गट), कैलास काशिनाथ पवार (सर्वसाधारण कारेगाव गट),
ज्ञानदेव सोपान पटारे (सर्वसाधारण टाकळीभान गट), अनिल प्रभाकर औताडे (सर्वसाधारण उंदिरगाव गट), संदीप भगवान आदिक (सर्वसाधारण उंदिरगाव गट),
सर्जेराव किसनराव कापसे (इतर मागासवर्गीय), हरिभाऊ गिताराम जाधव (अनु. जाती/जमाती), रविंद्रनाथ यशवंत पटारे (सर्वसाधारण वडाळामहादेव गट),
पुंजाहरी तुकाराम शिंदे (इतर मागासवर्गीय) आदिनाथ निवृृत्ती झुराळे (सर्वसाधारण वडाळामहादेव गट), देविदास विश्वनाथ सलालकर (सर्वसाधारण वडाळामहादेव गट), निलेश सुरेश आदिक (सर्वसाधारण उंदिरगाव गट),
भगिरथ रामराव जाधव (सर्वसाधारण कारेगाव गट), शांताबाई भगिरथ जाधव (महिला राखीव), उषाताई रवींद्र पटारे (महिला राखीव) नितीन बबनराव बनकर (सर्वसाधारण पढेगाव गट),
सारंगधर किसनराव आसने (सर्वसाधारण उंदिरगाव गट), कल्याण नामदेव लकडे (वि.जा.भ.ज./वि.मा.प्र.), अभिषेक भास्करराव खंडागळे (सर्वसाधारण पढेगाव गट), डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे (इतर मागास वर्ग),
बापूराव खंडेराव त्रिभुवन (अनु. जाती/जमाती), कल्पना सुरेश पटारे (महिला राखीव), बाबासाहेब कडू आदिक (सर्वसाधारण उंदिरगाव गट), दिनकर चिमणराव गायकवाड (वि.जा.भ.ज./वि.मा.प्र.),
कालर्र्स कचरू साठे (अनु. जाती/जमाती), अर्चना संजय पानसरे (महिला राखीव), खंडेराव निवृत्ती पटारे (सर्वसाधारण टाकळीभान गट), यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शुक्रवारी 17 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान 16 जानेवारीला मतदान होवून 17 जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम