‘तू’ अपशकुनी आहेस..! माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणत शिक्षिकेला…?

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : आज आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी विवाहित महिलांना विविध कारणास्तव शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अशीच घटना नगरमध्ये घडली आहे.घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दहा लाख रूपये आणण्यासाठी शिक्षिका असलेल्या विवाहितेचा तिच्या सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी पती व सासु-सासऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, नगर कल्याण रोडवरील विद्या कॉलनी, आदर्श नगर येथे राहणाऱ्या ज्ञानदा चेतन रोहोकले यांनी याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यात फिर्यादी महिलेचा पती चेतन भाऊसाहेब रोहोकले, सासरा भाऊसाहेब रामभाऊ रोहोकले, सासु अरूणा भाऊसाहेब रोहोकले यांनी फिर्यादीला तु अपशकुनी आहेस, असे म्हणून तिचा शारिरीक व मानसिक छळ केला.

तसेच घराच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून दहा लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत तिला वारंवार उपाशीपोटी ठेवून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe