30 लक्ष रूपये खर्चून होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ठ ; ग्रामस्थांनी काम बंद पाडले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील कारवाडी फाटा ते कारवाडी गावाअंतर्गत होत असलेल्या रस्त्याचे काम इस्टिमेंट प्रमाणे होत नसल्याने ग्रामस्थ महिलांनी एकत्र येत हे काम बंद पाडले आहे.

विशेष बाब म्हणजे जिल्हा वार्षिक योजना 2021 लेखा 3054 मार्ग व पुल ग्रामीण रस्ते विकास अंतर्गत रा. मा. 07 ते कारवाडी गावादरम्यान 30 लक्ष रूपये खर्चून होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ठ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत काम बंद पाडले.

रस्त्यावर अगोदर पडलेले खड्डे न बुजवता त्यावरच बी. बी. एम केल्याने रस्ता खाली-वर झाला. खाणीतील पक्की खडीचा वापर न करता विहिरीवरील कच्ची खडी वापरली.

रस्त्यावरील धुळ साफ न करताच त्यावरच खडी पसरवली. असे आरोप करत आम्हास नवीन रस्ता नको आमचा पूर्वीचाच रस्ता पाहिजे अशा घोषणा ग्रामस्थांनी केल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!