सध्या इडीची किंमत शेतकऱ्याच्या खिशातील बिडीपेक्षा कमी : मुंडे

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सध्या इडीची किंमत आमच्या शेतकऱ्याच्या खिशातील बिडीच्या किंमती पेक्षा कमी झाली आहे. अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. कर्जत येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.(Minister Dhananjay Munde) 

पुढे ते म्हणाले की, कर्जतकरांनी रोहित पवार यांना निवडून दिले दोन वर्षात कर्जतचे नाव गुजरात पर्यत पोहचले. आगामी तीन वर्षांत कर्जतचे नाव दिल्ली पर्यत धडकेल.

नगर पंचायतीच्या निवडणुकीमधून कार्यकर्त्याना मोठे करण्याची ही निवडणूक असते. दुष्काळाच्या काळात रोहित पवार यांनी पाणी देण्याचे काम केले ज्याकडे त्यावेळच्या मंत्र्याचे लक्ष नव्हते,

अशी टीका करताना मोठ्याच्या कुटुंबातील लेकरू असलं तरी ते तुम्हाला आपलं वाटतंय हा खरा विश्वास आहे. नगर पंचायतीच्या रूपाने तो पुन्हा दाखवून द्या विश्वास बसणार नाही असा विकास करून दाखवू असे शेवटी म्हटले.

यावेळी गुजरात काँग्रेसचे प्रदेश कार्यअध्यक्ष हार्दिक पटेल म्हणाले की, गुजरातमध्ये चांगल्या चांगल्याला पाणी पाजले आहे. हे तर कर्जत आहे. आ. रोहित पवार यांच्यामुळे कर्जतची ओळख निर्माण झाली आहे.

ज्या गुजरात मॉडेलवर लोकांना भुलवल जातं त्याचे वास्तव सांगण्यासाठी मी आलो आहे. गेली दोन वर्षात २४० कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत, गुजरातमध्ये चोरांबरोबर लढताना ९ वर्ष तुरुंगवास ही भोगला आहे.

महाराष्ट्र भूमीने कधी दिल्ली समोर डोके झुकवले नाही. असे म्हणत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आम्हाला बदनाम करण्यासाठी सर्व प्रकारचे राजकारण केले जाते. विजय झाल्यानंतर मी पुन्हा येऊन आपल्याबरोबर शिपी आमटी खाणार असल्याचे म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe