पर्यावरणदिनी पर्यावरण परिषदेचे आयोजन आत्मनिर्धार फाउंडेशनचा पुढाकार

Published on -

अहिल्यानगर : सातत्याने होणारी तापमान वाढ, प्रदूषण, वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमान चक्र विस्कळीत झाल्याने निर्माण होणारी अस्मानी संकटे यासह येत्या काळात मानव समुदायावर ओढवणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर चर्चा आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील पर्यावरणप्रेमी मंडळींनी पुढाकार घेत पर्यावरण परिषदेचे आयोजन केले आहे.

५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. हेच औचित्य साधून आत्मनिर्धार फाऊंडेशन संचलित पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून इसळक येथील लिंगतीर्थ येथे पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष भानुदास कोतकर यांनी दिली.

शेंडी– पिंपळगाव माळवी परिसरातील टेंभी डोंगरावर पर्यावरणप्रेमी मंडळींनी रविवारी ( ता. १८ मे ) सकाळी मॉर्निंग वॉक केला. यावेळी शरद कराळे व सुदाम लांडगे यांनी टेंभी डोंगरावरील वटवृक्ष संवर्धन चळवळीची उपस्थितांना माहिती दिली. दरम्यान, सर्व सदस्यांनी पहिल्या पर्यावरण परिषदेची नियोजनपूर्व बैठक घेतली. कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. बैठकीसाठी सुनील जाजगे, रामदास कोतकर, पत्रकार संदीप बांगर, ज्ञानेश्वर डहाळे, भास्कर कोतकर, सुदाम घोडके, भाऊसाहेब म्हस्के, दुर्गवेडे भ्रमंती ट्रेकिंग ग्रुपचे अंकुश लोंढे, मच्छिंद्र म्हस्के यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. या उपक्रमात अधिकाधिक पर्यावरण आणि निसर्गप्रेमी मंडळींनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे समन्वयक ॲड. राहुल ठाणगे यांनी केले.

धोरणात्मक निर्णय आणि कृती कार्यक्रमासाठी परिषदेचे आयोजन : महादेव गवळी

वाढत्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेता वृक्ष लागवड आणि संवर्धन चळवळ आवश्यक असून त्यासाठी पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. यातील चर्चेतून काही धोरणात्मक निर्णय घेऊन त्यानुसार कृती कार्यक्रम हाती घेतले जातील, अशी माहिती आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News