Ahmednagar News : अभिषेक भगत यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Published on -

Ahmednagar News : बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अभिषेक विजय भगत यांच्यावर बुधवारी (दि. १३) तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सावेडी येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयात तुळजाभवानी मंदिराच्या प्रकरणासंदर्भात सुनावणी होती. सुनावणीनंतर पुढील तारीख मिळाल्याने फिर्यादी व साक्षीदार हे कार्यालयाच्या पार्किंग मध्ये जवळून जात असताना

अभिषेक भगत (रा. बुऱ्हाणनगर) यांनी विनोद राजू साळवे (रा. बुऱ्हाणनगर) यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली. साळवे यांच्या फिर्यादीवरुन भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe