ऑडिओ क्लिप व्हायरल ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ कार्यालयाची अब्रू चव्हाट्यावर?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्‍यातील तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकक्षेतील वैजुबाभुळगाव येथे सुरू असलेल्या मातीबांधचे काम निकृष्ठ झाले असल्याची तक्रार सरपंच व उपसरपंच यांनी केली होती.

या तक्रारीची दखल घेत संबधित कामाची वरीष्ठ पातळीवर चौकशी सुरु असतानाच सरपंच, उपसरपंच यांनी आर्थिक मागणी केल्याचे वन कर्मचाऱ्याच्या आवाजातील मोबाईलवरील कॉल रेकॉडिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वनविभागाची अब्रु चव्हाटयावर आली आहे.

या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर सरपंच व उपसरपंच यांनी आमची बदनामी केली असून, संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याचे निलंबन करण्यात यावे अन्यथा मंगळवारी (दि. २७) उपवनसंरक्षक कार्यालव येथे आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबतची माहिती अशी कौ, तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेतील वैजुबाभुळगाव येथे मातीबांधची कामे सुरु आहेत. ही कामे निकृष्ठ होत असल्याची तक्रार गावचे सरपंच व उपसरपंच यांनी उपवन संरक्षण अधिकारी, अहमदनगर यांच्याकडे केली,

या तक्रारीची दखल घेऊन उपवन संरक्षण अधिकाऱ्यांनी राहुरीचे सहाय्यक वनसंरक्षक (वनिकरण व वन्यजीव) गणेश मिसाळ यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

संबधित अधिकाऱ्यांना वैजुबाभुळगाव येथील निकृष्ठ मातीबांध कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अधिकारी म्हणून प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी भेटी देवून विहित मापदंडानुसार व मूळ मंजूर अंदाजापत्रकानुसार कामे झाली किंवा कसे तसेच सदर कामाची देयके संबधित कंत्राटदार यांना द्यावी, याबाबतचा अहवाल सादर करावा.

तसेच संबधित सरपंच व उपसरपंच यांनी दिलेल्या निवेदनातील इतर मागण्यांची चौकशी करण्याचे आदेश देत संबधितांना उपोषणापासून परावृत्त करावे, असे म्हटले आहे.

दरम्यानच्या काळात तिसगाव वनविभागातील एक कर्मचारी वैजुबाभळगाव येथील एका व्यक्तीसोबत मोबाईलवर संभाषण करताना सरपंच व उपसरपंच यांनी आर्थिक मागणी केल्याचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

यामुळे वनविभागातील अनागोंदी कारभार जनतेसमोर आला असून, तिसगाव वनविभागांतर्गत होत असलेल्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

याबाबत तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांना भेटून प्रतिक्रवा विचारली असता, ते म्हणाले, या कामांबाबत चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ यांची नियुक्‍ती केली असल्याने ते चौकशी करत असल्याचे म्हणत ऑडिओ क्लिपबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

तर चौकशी अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, ज्या मातीबांध कामाबाबत तक्रार करण्यात आली होती, त्या कामाची चौकशी सुरु आहे.

व्हावरल ऑडिओ क्लिपबाबत विचारले असता, त्याबाबतची चौकशी माझ्याकडे नसल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe