माहिती देण्यास टाळाटाळ करणे आरोग्याधिकारी डॉ. बोरगेंना पडली महागात

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या काळात कार्यालय परिसरातच वाढदिवसाच्या जंगी पार्टीमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे हे चांगलेच अडचणीत सापडले होते.

आता ते एका नव्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाबाबत माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना राज्य माहिती आयोगाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या दंडाची रक्कम डॉ. बोरगे यांच्या वेतनातून कपात करण्याचे आदेश उपायुक्तांना देण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, एका व्यक्तीने डॉ. बोरगे यांच्याकडे आरोग्य विभागासंदर्भात 3 सप्टेंबर 2018 रोजी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती.

मात्र डॉ. बोरगे यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर अपिलार्थीने राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठात दाद मागितली होती.

खंडपीठाने याबाबत प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपायुक्त यशवंत डांगे यांच्याकडे खुलासा मागितला होता. त्यानंतर खंडपीठाने डॉ. बोरगे यांना पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe