Ahmednagar : पंतप्रधानांच्या हस्ते आयुष रुग्णालयाच उदघाटन झालं, पण अद्यापही उपचार कक्ष बंदच ! विदारक स्थिती समोर

Published on -

Ahmednagar News : राज्यातील विविध ठिकाणी जिल्हा रुग्णालयांची काय स्थिती आहे याबात अनेक वृत्त मागील काही दिवसांत प्रसिद्ध होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात देखील थोड्याफार फरकाने हीच स्थिती.

दरम्यान आता मागच्याच महिन्यात २६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या आयुष रुग्णालयाचे लोकार्पण केले होते त्याबाबतही विदारक स्थिती समोर आली आहे. शहर कॉग्रेसच्यावतीने आयुष रूग्णालयाची पाहणी करण्यात आली

तेव्हा विविध धक्कादायक गोष्टी समोर आल्याचं प्रत्यक्षदर्शनींनी सांगितलं. त्यामुळे सर्वसामान्यांची फरफट थांबणार तरी कधी हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला.

* उपचार विभागासह अनेक विभाग बंद

आयुष रूग्णालयात अनेक कक्ष आहेत. ते सगळे कक्ष बंद आढळून आले. इमारत परीसरात स्वच्छता कोठेही आढळून आली नाही. रुग्णालयात असणारे पंचकर्म कक्ष, रक्त तपासणी प्रयोगशाळा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कक्ष, उपकर्म कक्ष, मेडिकल स्टोअर,

अंतररुग्ण कक्ष, लेखा विभाग, बाह्यरुग्ण कक्ष, इलाज बीज तदबीर कक्ष, योगा बाह्यरुग्ण कक्ष, निसर्ग उपचार कक्ष, योग सभागृह, गर्भसंस्कार व हिरकणी कक्ष, शस्त्रक्रिया विभाग आदींसह सर्वच बंद असल्याने ही धक्कादायक बाब ठरली.

पालकमंत्र्यांनी बंद अवस्थेतील रुग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण करून घेतले असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे किरण काळे यांनी केली.

* काय म्हणतायेत जिल्हा आयुष अधिकारी ?

याबाबत विचारणा केली असता जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मनोज घुगे म्हणाले की, आयुष कक्ष पूर्वीपासूनच आपल्याकडे असून या कक्षातील दहा कर्मचारी नव्याने झालेल्या रूग्णालयात त्यांचे काम सुरू आहे. सध्याला मात्र या ठिकाणी केवळ ओपीडी सुरू आहे.

सध्या येथे सुमारे ५० मनुष्यबळाची अधिक गरज आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एकदा माणसे उपलब्ध झाली की, सगळे कक्ष सुरु होतील असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe