बाबो..! एवढा महाग प्रवास ? एसटी पेक्षा खासगी वाहन परवडले…

२७ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ २५ जानेवारी पासून लागू झाली आहे.त्यामुळे नगर-पुणे प्रवास २७ ते ३४ रुपये महागला आहे.नगर-पुणेसाठी साध्या बसचे तिकीट आता २०२, तर शिवशाहीचे तिकीट २८४ रुपये झाले आहे.राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक शुक्रवारी मंत्रालयात पार पडली.त्या बैठकीत एसटीसह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.

डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ दरवर्षी होणे अपेक्षित असते.मात्र मागील ३ ते ४ वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती.त्यामुळे आता एकत्रित १४.९७ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली असून ती शनिवार पासून लागू होईल,असे महामंडळाने कळवले आहे.प्रतिटप्पा १० ते १४ रूपये भाडेवाढ एसटीने केलेली ही भाडेवाढ २५ जानेवारीपासून लागू झाली आहे.सुधारित दरानुसार आता साधी व जलद, तसेच रातराणी बस सेवेला एका टप्प्याला १०.५ रूपये, वातानुकूलित शयन आसनी बसला १३.६५, तर शिवशाही बसला १४.२० रूपये प्रतीटप्पा दर आकारला जाणार आहे.

सुधारित भाडे खालीलप्रमाणे (कंसात पूर्वीचे भाडे)

अहिल्यानगर-सोलापूर- साधी बस ३९३ (३४०) – निमआराम ५३३ (४६५)
अहिल्यानगर-कल्याण – साधी बस – ३६३ (३१५ – निमआराम ४९२(४२५)
अहिल्यानगर-नाशिक – साधी बस २९२ (२५५) – निमआराम ३९७ (३४५
अहिल्यानगर-पंढरपूर – साधी बस – ३३३ (२९०) निमआराम ४५१ (३९०)
अहिल्यानगर-पुणे – साधी बस – २०२ (१७५) निमआराम २७४ (२४०)
अहिल्यानगर-मुंबई – साधी बस ४७३ (४१०) निमआराम ६४३ (५६०)
अहिल्यानगर-संभाजीनगर – साधी बस २०२ (१७५) निमआराम २७४ (२४०)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe