बाळासाहेब थोरातांनी सांगितला ‘तो’ प्रसंग ! मी कांचनला पाहायला गेलो. तिथे त्यांचे घर…

Published on -

Ahmednagar News : राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा काल बुधवारी (दि.७) वाढदिवस होता.

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली.

यावेळी आ. थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांच्या भाषणाने सवाँची दाद मिळवली. आ. थोरात साहेबांना वेळ नसतो, म्हणून मी मैत्रिणी जमवल्या, ग्रुप केला. सामाजिक काम उभे केले,

म्हणून आता साहेबांची आठवण येत नाही, पण मला थोरात कुटुंबीयांनी जी साथ दिली, ती कधीही विसरू शकत नाही, असे कांचनताई थोरात म्हणाल्या.

काँग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस कार्यकत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे आयोजन देखील वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरात करण्यात आले.

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रात्री झालेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात थोरात आणि तांबे कुटुंबीयांबरोबर पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

निवासस्थानासमोर झालेल्या या सोहळ्यात आ. बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेबांचा स्वभावच उपस्थितांसमोर मांडला. “साहेब आता ७० वर्षांचे होताय..

मी त्यांच्या पेक्षा ७ वर्षांनी लहान. साहेब जेव्हा मला पाहायला आले, तेव्हा मी त्यांचे पाय पाहूनच त्यांना पसंत केले. त्यांनी माझा चेहरा पाहिला असेल, मात्र मी फक्त पायच पाहू शकले. आमचा योगायोग होता म्हणून लग्न जमलं.

लग्नानंतर २० वर्ष कधी पिक्चर आणि नाटकाला सुद्धा नेलं नाही. रोज फक्त पाव्हणेरावळे हेच करत आले. साहेबांनी मला अमेरिका, दुबई खूप फिरवलं मात्र ते ३० वर्षानंतर. साहेबांना वेळच नव्हता. मला कुटुंबाने खूप साथ दिली.

नंतर मी मैत्रिणीचा ग्रुप बनवला, त्यांनी खूप साथ दिली, त्यामुळे आता काय मला ही साहेबांची आठवण येत नाही, असं कांचनताईनी सांगताच एकच हशा पिकला.

माझा निर्णय अचूक ठरला – आ. थोरात
कांचनताईच्या टिप्पणीला आमदार थोरात यांनीही मिश्किल उत्तर दिले. माझं राजकरण काम सगळ्यांना माहित आहे. मी महाविद्यालयात असताना मला तिथेच पाहुणे पाहायला आले. एका व्यापा-याने त्यावेळी सांगितल की, मुलगा चांगला आहे.

वकील आहे, गोरा गोमटा आहे. मी कांचनला पाहायला गेलो. तिथे त्यांचे घर व मोठ कुटुंब सदस्य पाहूनच ठरवले, हे आपल्याकडेबरोबर जमेल. कोण चालेल आपल्या घरी ही दूरदृष्टी आणि अचूक निर्णय माझा ठरला. त्यामुळे कटकट नावाचा प्रकार आजपर्यत नाही. तुमचं तुम्हाला माहित म्हणताच पुन्हा हशा पिकला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News