अहमदनगर ब्रेकिंग : यामाहाच्या शोरुममधेच डाका, ‘इतक्या’ दुचाकी लांबवल्या

Published on -

अहमदनगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसते. मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. आता आणखी एक बातमी आली असून थेट यामाहाच्या शोरुममधेच चोरी झाली आहे.

संजोग हॉटेलसमोरील यमाहा कंपनीच्या मोटारसायकल विक्रीच्या बन्सन मोटर्स शोरुममधून दुचाकी लंपास झाल्या आहेत. या प्रकरणी अंचीत राजेश बन्सल (वय-25 वर्षे, रा. रासने नगर, सावेडी) यांनी काल १५ डिसेंबर २०२३ रोजी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत अंचीत यांनी म्हटलं आहे की, संजोग हॉटेल समोर त्यांचे यमाहा कंपनीच्या मोटारसायकल विक्रीचे बन्सन मोटर्स नावाचे शोरुम आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांनी
30 ऑक्टोबर 2023 रोजी शोरूममधील दुचाकींचा स्टॉक तपासला होता. त्यानंतर त्यांनी 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी पुन्हा स्टॉक तपासणी केली.

यावेळी शोरूममधील एकूण स्टॉकमध्ये दोन एफ झेड एस मोटारसायकल कमी आढळल्या. त्यांनी आसपास शोध घेतला पण आढळून आल्या नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.

यमाहा कंपनीची ग्रे कलरची १ लाख ३० हजार किमतीची एफ झेड एस विना पासींग चेसी नं- ME1RG66X9P0013928 इंजिन नं-G3N5E035804, व ब्लॅक कलरची १ लाख ३० हजार किमतीची एफ झेड एस विना पासींग चेसी नं- ME1RG66U6P0006484 इंजिन नं-G3N3E0322005 या दोन दुचाकी चोरून नेल्याचे त्यांनी म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News