बँक कंट्रोलचा पोलिसांना एक फोन आला आणि एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; चोरटेही पकडले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या एसबीआयच्या दोन एटीएम पैकी एक एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न गस्ती पथकावरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.

एटीएम फोडत असताना पोलिसांनी सनी सुरजसिंग भोड (वय 25 रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) याला पकडले तर दोघे पसार झाले होते.

पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन जेरबंद केले आहे. गुरूवारी रात्री तीन चोट्यांनी सुरूवातीला एटीएमची टेहाळणी केली. रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास चोरटे एका एटीएममध्ये घुसले.

एटीएमच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही तोडले व एटीएम फोडले. ही बाब एटीएम सुरक्षेसाठी मुंबईमध्ये असलेल्या बँकेच्या नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍यांच्या लक्षात आली.

त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने ही माहिती कोतवाली पोलिसांना सांगितल्यानंतर कोतवालीच्या रात्र गस्ती पथकावर असलेले पोलीस घटनास्थळी पोहचत एका चोरट्याला पकडले.

अंधाराचा फायदा घेत दोघे चोरटे पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांनाही जेरबंद केले. चिक्या उर्फ रोहित मेहेत्रे (रा. माळीवाडा) व सोनु सुरजसिंग भोड (संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) अशी जेरबंद केलेल्या दोघांची नावे आहेत. कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe