अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- यंदा पर्यावरण पूरक गणपतीच्या विसर्जनानंतर घरोघरी ऑक्सिजन देणारी तुळशी वनस्पती उगवणार आहे. त्यासाठी ४२ बाल मूर्तिकारांना प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण दिले आहे.
पैस सामाजिक प्रतिष्ठान व शिव कृष्ण स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी यांच्या विद्यमाने आयोजित पर्यावरणपूरक गणपती बनवा कार्यशाळेत ४२ विद्यार्थी सहभाग घेतला.
गायत्री जाधव या शिल्पकला प्रशिक्षक शिक्षिकेने मुलांना मार्गदर्शन केले. मुलांकडून मुर्त्या बनवून घेतल्या. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत या कार्यशाळेत विद्यार्थी मुलांना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मूर्ती बनवणारे शिल्पकार भगवान रामपुरे यांनी उपक्रमाचे कौतुक करत मार्गदर्शन तर केले.
मुलांचा उत्साह व परिसर पाहून भगवान रामपुरे यांनी पुन्हा कार्यशाळा घेण्याचे आश्वासन दिले. चित्रकार भरतकुमार उदावंत, सत्यजित उदावंत, पैस सामाजिक प्रतिष्ठानचे महेश मापारी व शिव कृष्ण स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रदीप राजगिरे यांनी आयोजन केले. मुलांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.
सर्व मुलांना गणपती बनवायला दिलेल्या मातीमध्ये तुळशीचे बी टाकलेले होते. या मूर्ती मुलांनी घरीच कुंडीत विसर्जित करायच्या आहेत. विसर्जित मूर्तीच्या मातीतून प्रत्येक घरात ऑक्सिजन देणारी तुळशी उगवेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम