शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी हे नवीन नियम नक्की जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस धार्मिक स्थळी प्रवेश घेण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागत होते. तसेच काहींना प्रवेश बंदी देखील करण्यात आली होती. मात्र आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

कोरोना प्रतिबंधात्‍मक लसची दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर १४ दिवस पुर्ण झालेल्‍या गरोदर स्त्रिया व ६५ वर्षाच्‍या पुढील व्‍यक्‍तींना दिनांक १३ नोव्‍हेंबर २०२१ रोजी पासुन श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनाकरीता प्रवेश देण्‍यात येणार आहे.

याबाबतची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी दिली. दरम्यान शासनाच्‍या वतीने राज्‍यामध्‍ये कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर धार्म‍िकस्‍थळे, प्रार्थनास्‍थळे यामध्‍ये गरोदर स्त्रिया व ६५ वर्षाच्‍या पुढील व्‍यक्‍तींना प्रतिबंधात्‍मक निर्बंध होते.

मात्र राज्‍याशासनाने दिनांक १० नोव्‍हेंबर २०२१ रोजी काढलेल्‍या अध्‍यादेशानुसार कोरोना प्रतिबंधात्‍मक लसची दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर १४ दिवस पुर्ण झालेल्‍या गरोदर स्त्रिया व ६५ वर्षाच्‍या पुढील व्‍यक्‍तींना धार्म‍िकस्‍थळे, प्रार्थनास्‍थळे यामध्‍ये प्रवेश देण्‍याबाबत निर्देश दिलेले आहेत.

त्‍यानुसार श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने दिनांक १३ नोव्‍हेंबर २०२१ रोजी पासुन अमंलबजावणी सुरु करण्‍यात आली असून याबाबत आवश्‍यक त्‍या उपाययोजना करण्‍यात आलेल्‍या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe