अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- चांदबीबी महालावर पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. भरत मच्छिंद्र माळी (रा. सय्यदमीर लोणी ता. आष्टी जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे.
या आरोपीला नगर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी, प्रवीण गोविंदराव निटूरकर (वय 52 रा. लक्ष्मीटॉवर, ज्ञानसंपदा शाळेच्या पाठीमागे, सावेडी) हे कुटुंबीयासह चांदबिबी महालाच्या डोंगरावरती पॉलिहाऊसकडे जाणारा कच्चा रस्त्यावर फिरण्यास गेले होते.

त्यांच्याकडील दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम, मंगळसूत्र असा एकूण 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चाकूचा व दगडाचा धाक दाखवून चोरट्यांनी लुटला होता.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीरून नगर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगर तालुका पोलीस ठाण्याचं पथकाने आरोपीला अटक केली आहे.
तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अहमदनगर व बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम