अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर शिवारातपश्चिम बंगाल येथील वासुदेव तुफान मार्डी (वय-४०) यास चोर समजुन त्याच गावातील काहींनी बेदम मारहाण केली.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ०३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी एक अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता.
यात पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण दिनाजपुर जिल्ह्यातील बालोरीया येथील मजूर वासुदेव मार्डी (वय-४०) याचे निधन झाले होते.
या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली होती. मात्र त्याचा तपास करताना त्यांना धक्कादायक माहिती हाती आली होती.
त्यात मिळालेल्या माहितीनुसार मयत हा चारी परिसरात संशयास्पदरित्या फिरत असताना आरोपीनी त्यास चोर समजून त्यांच्या हातातील काठ्या व फावड्याने त्यास मारहाण करून गंभीर दुखापत केली होती.
त्या नंतर त्यास काही नागरिकांनी कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान या इसमाचे निधन झाले होते.
याप्रकरणी फिर्यादी अर्जुन दारकुंडे यांनी फिर्याद दाखल करून यातील आरोपी मच्छीन्द्र श्रावण संवत्सरकर,अमोल विठ्ल संवत्सरकर,बापू गोरख संवत्सरकर व सुरेश पांडुरंग दादरे यांनी काठी व पावड्याने मारहाण केले बाबत गुन्हा दाखल केला होता.
यातील दोन आरोपींना गजाआड करून कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांचे समोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













