काकडे यांच्यामुळेच दुष्काळी भागाला ताजनापूरचे पाणी मिळणार !

Ahmednagarlive24 office
Published:
हर्षदाताई काकडे

ताजनापुर लिफ्ट टप्पा क्र.१ या बंद असलेल्या योजनेतून वरुर आखेगाव सह ९ गावांना पाणी मिळावे यासाठी हर्षदाताई काकडे यांनी शासन दरबारी सर्वतोपरी केलेल्या प्रयत्नाला व संघर्षाला आम्ही गावकरी कधीच विसरू शकत नाही.

त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ताजनापूरचे पाणी या दुष्काळी भागाला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे वरील ९ गावातील आम्ही शेतकरी सदैव त्यांच्यासोबत खंबीरपणे राहणार असल्याचे प्रतिपादन खरडगाव येथील प्रगतशील शेतकरी मा.चेअरमन भाऊसाहेब बोडखे यांनी खरडगाव येथे केले.

खरडगाव येथे बंद असलेल्या सुधारित ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. १ या योजनेतून वरूर आखेगाव सह ९ गावांतील तलाव, बंधारे भरून मिळण्याच्या कामाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भगवानराव गायकवाड हे होते तर कार्यक्रमास मुरलीधर बोडखे, उपसरपंच प्रवीण गायकवाड, वसंत लबडे, जगन्नाथ बोडखे, मधुकर झिरपे, भास्करराव देशमुख, ज्ञानेश्वर बोडखे, बबनराव लबडे, एकनाथ बोडखे, बाबुराव काकडे, वसंत बोडखे, शिवाजीराव डावरे, भीमराव बोडखे, विठोबा बोडखे, कृष्णा बोडखे, राजू गायकवाड, महेश बोडखे, गोरक्ष काकडे, आदी प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी बोडखे म्हणाले की, अॅड. शिवाजीराव काकडे व हर्षदाताई काकडे हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून आमच्या दुष्काळी कोरडवाहू गावांना पाणी मिळावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत आहेत. या पाण्याच्या मागणी संदर्भात विविध कार्यालयावर आम्ही शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या समवेत आंदोलने केलेली आहेत.

त्यांची शेतकऱ्याविषयीची तळमळ आम्ही गावकरी कधीच विसरू शकत नाहीत. त्यांचे अथक प्रयत्नामुळेच शासनाने या योजनेतील आखेगाव वरून सह ९ गावांचे सर्वेक्षण सुरू केले असून आज खरडगाव येथील सर्वेक्षण सुरु झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा.पं. सदस्य अमोल बोडखे यांनी तर आभार उपसरपंच प्रवीण गायकवाड यांनी मानले.

त्यांच्यासाठी हा पुरावा

विरोधक आम्हाला सतत टिंगल करून म्हणायचे की, कधी येणार तूमचे ताजनापूरचे पाणी’. त्यांच्यासाठी हा सर्वेक्षण कामाचा पुरावा आज पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा यापुढे शेतकरी एकजूटीमध्ये येऊन लवकरात लवकर भागात पाणी येण्याकरिता करिता कृती समितीला सर्वतोपरी मदत करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe