Ahmednagar News : अहमदनगर कर सावधान ! कारला काळी काच लावण्याआधी ही बातमी वाचाच !

Published on -

Ahmednagar News : कोतवाली पोलिसांनी वाहनांना काळ्या काचा लावणाऱ्या ११५ जणांवर कारवाई करण्यात केली असून, ९५,५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच, विना नंबर वाहन, फॅन्सी नंबर प्लेट्सही पोलिसांच्या रडारावर असून पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहने तपासली जात आहेत.

नियमांचा भंग करत वाहनांना काळ्या फिल्म्स लावणारे आणि फॅन्सी नंबर प्लेटधारकांची संख्या मोठी असल्यामुळे ही कारवाई अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने कोतवाली पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. वाहनांच्या समोरील आणि पाठीमागचे काच ही ७० टक्के आणि बाजूच्या काचा किमान ५० टक्के पारदर्शक असाव्यात असा केंद्रीय मोटर वाहन अधिनियमात नियम १०० नुसार बंधनकारक आहे.

काचांवर कोणत्याही प्रकारच्या काळ्या फिल्म्स अथवा इतर पदार्थ लावू नये. लावल्यास पोलिसांनी अथवा संबंधित अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी त्या काढून टाकाव्यात, असे शासनाचे २० ऑक्टोबर २०१२ चे आदेश आहेत.

परंतु अत्यंत दाट काळ्या रंगाच्या काचा बसवून किंवा काचांवर फिल्म चिकटवून गाड्या अपारदर्शक करण्याचा प्रयत्न वाहनचालकांकडून केला जातो. विशेषतः बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचा अशा काळ्या काचा करण्याकडे ओढा असल्याचे निदर्शनास येत आहे.

अशा वाहन चालकांविरोधात कोतवाली पोलिस गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने कारवाई करत आहेत. १ मार्च ते २४ जुलै पावतो ११५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, ९५,५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News