त्यांच्यापासून सावध रहा, प्रवरेला ऊस देऊ नका; त्यांना आता अशोक कारखाना बंद पाडायचा आहे- अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे

अहिल्यानगर जिल्हा म्हटला म्हणजे हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो व या ठिकाणचे राजकारण हे नेहमी साखर उद्योगाच्या भोवती फिरत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी साखर उद्योगावरून किंवा साखर कारखान्याच्या संदर्भात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात व ही स्थिती आपल्याला गेल्या कित्येक वर्षापासून जिल्ह्यात दिसून येते.

Ajay Patil
Updated:

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्हा म्हटला म्हणजे हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो व या ठिकाणचे राजकारण हे नेहमी साखर उद्योगाच्या भोवती फिरत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी साखर उद्योगावरून किंवा साखर कारखान्याच्या संदर्भात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात व ही स्थिती आपल्याला गेल्या कित्येक वर्षापासून जिल्ह्यात दिसून येते.

अगदी याच पद्धतीने जर आपण सध्या बघितले तर अशोक कारखान्याचे माझे चेअरमन सुरेश गलांडे व ज्ञानदेव साळुंखे यांनी अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस प्रवरा कारखाना नेत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही मुद्द्यांवर भाष्य केले व आरोप देखील केलेत.

यावेळी त्यांनी म्हटले की,प्रवरेच्या नेत्याला मंत्रीपदाची सत्ता जेव्हा मिळते त्या त्यावेळी त्यांनी आपल्या भंडारदराच्या हक्काच्या पाट पाण्यावर अन्याय केला. प्रवरा परिसर व ओझरच्या बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत उपसा सिंचन योजना निर्माण केल्या व त्यामुळे भंडारदरा धरणातील पाणी प्रवरेच्या भागांमध्ये जास्त उपसले जाऊ लागले व आपल्या भागात असणारे ऊसाचे बारमाही ब्लॉक व इतर ब्लॉक रद्द करून हक्काचे पाणी घालवले.

पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनच्या नावाखाली दरवेळेला अनधिकृतपणे प्रवरा परिसरातील शेतीकरिता पाणी वापरले जाते. या उलट माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी कारखाना कार्यक्षेत्रात अनेक उपक्रम राबवून पाण्याची व उसाची उपलब्धता वाढवली होती.

अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाकरिता प्रवरेच्या नेत्याचे योगदान काय? असा सवाल अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे व ज्ञानदेव साळुंखे यांनी केला. सध्या अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस प्रवरा कारखाना नेत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील माहिती दिली.

काय म्हटले सुरेश गलांडे व ज्ञानदेव साळुंखे?
याविषयी माहिती देताना त्यांनी म्हटले की, अशोक कारखान्याच्या सभासदांनी सन 1987 यावर्षी कारखान्याची सत्ता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा विकास आघाडीकडे सोपवली होती व त्यावेळी दुष्काळी परिस्थिती सह प्रवरा व संगमनेर परिसरात प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत लिफ्ट योजनेद्वारे भंडारदराच्या सोडलेल्या पाण्याचा उपसा केला जात होता.

त्यामुळे श्रीरामपूरच्या भागात शेतीच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे त्यावेळी आपल्या अशोक कारखाना कार्यक्षेत्रात व श्रीरामपूर तालुक्यात सर्व मिळून जेमतेम पस्तीस हजार टन उसाची उपलब्धता होती.

परंतु अशा बिकट परिस्थितीत देखील माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व संचालक मंडळांने अशोक कारखाना चालू राहावा याकरिता 350 ते 400 km अंतरावरून ऊस आणून पहिला गाळप हंगाम यशस्वी करून दाखवला होता.

तसेच या संचालक मंडळाने कारखान्याच्या माध्यमातून गावोगावी कारखान्याच्या सात ते आठ बुलडोजरच्या साह्याने अशोक बंधारे व शेततळे तयार केले व गावोगावी नाला बडींग तसेच पाझर तलाव, गावतळी निर्माण केली.

इतकेच नाहीतर कित्येक गावांमध्ये कोल्हापूर टाईपचे बंधारे देखील बांधले व भंडारदरा धरणाच्या हक्काचा पाण्यासाठी मोर्चे आणि आंदोलने देखील केली. परंतु प्रवरेच्या नेत्यांच्या ताब्यामध्ये राजकीय सत्ता असल्यामुळे प्रवरा डावा कालव्यावर त्यांनी पक्के आडवे बांध बांधून पाणी प्रवरा परिसरात उचलता यावे याची व्यवस्था केली होती.

परंतु मुरकुटे यांनी प्रवरा परिसरातील पक्के सिमेंटचे बांध सुरुंग लावून फोडले. या आंदोलनामुळे मुरकुटे यांच्यासह कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना तुरुंगात देखील जावे लागले होते असे देखील त्यांनी म्हटले.

समन्यायी पाणी वाटप कायद्याचे प्रवरेचे नेते आमदार असताना त्यांनी समर्थन केले. अशाप्रकारे जर श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांनी प्रवरेस ऊस दिला तर अशोक कारखाना अडचणत सापडणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

राहुरी कारखान्याप्रमाणे त्यांना अशोक कारखाना बंद पाडायचा- अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे व ज्ञानदेव साळुंखे यांचे प्रतिपादन
यावर्षी प्रवरा कारखान्याने इतर कारखान्यांपेक्षा जास्त भाव दिला असून यामागील प्रमुख कारण म्हणजे यावर्षी विधानसभा निवडणुकीत ते उमेदवार असल्याने मुद्दामून जिल्ह्यातील इतर सर्व साखर कारखान्यापेक्षा जास्तीचा भाव त्यांनी दिला. या अगोदर त्यांनी अशा तऱ्हेने भाव दिला नाही.

ज्याप्रमाणे त्यांनी राहुरी साखर कारखाना बंद पाडला व ज्यांनी गणेश कारखान्याची वाटोळे केले.त्यांना आता श्रीरामपूर तालुक्यातील कामधेनू अशोक कारखाना बंद पाडायचा आहे व त्यांच्यापासून आता सावध राहा आणि प्रवरेला ऊस देऊ नका असे देखील आवाहन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe