Bhandardara News : भंडारदरा पाणलोट क्षेत्राला पावसाने झोडपून काढले

Published on -

Bhandardara News : अकोले तालुक्यातील घाटघर येथे मुसळधार पाऊस कोसळत असून गत २४ तासांत साडेसात इंच पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी तर भंडारदरा पाणलोट क्षेत्राला पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात बुधवारी सायंकाळपासून पाऊस सुरु झाला. गुरुवारी व शुक्रवारी पाणलोटासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. गत आठ ते दहा दिवस भंडारदरा पाणलोटात पावसाने दडी मारली होती.

त्यामुळे भातखाचरामधील पाणी कमी झाल्याने भातपिके धोक्यात आली होती. पुन्हा पावसाची जोरदार बॅटींग सुरु झाल्याने भातपिके पुन्हा जोमाने उभी राहील्याचे चित्र उभे राहिले आहे. शुक्रवारी भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला.

सकाळपासुन सुरु झालेल्या पावसाने शेंडीच्या बाजारामध्ये बाजारकरूंची चांगलीत तारांबळ उडाली. पावसाबरोबरच हवेमध्ये प्रचंड गारवा असल्याने सणाचा बाजार असुनही घरातच राहणे पसंत केले गुरुवारी घाटघर येथे मुसळधार पाऊस कोसळला. १८८ मीमी म्हणजे साडेसात इंच पावसाची नोंद झाली. तर कळसुबाई शिखरावरही मुसळधार पाऊस कोसळत असून कृष्णावंती नदी दुथडी भरुन वाहत आहे.

गत २४ तासात भंडारदरा येथे २३ मीमी पाऊस झाला असुन घाटघर येथे १८८ मीमी पाऊस पडला. तर रतनवाडीला १७ मीमी, पांजरे २० तर वाकी येथे १० मीमी पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले;

मात्र वीजनिर्माण केंद्रातून पाणी विसर्जित होत असल्याने धरणाचा पाणीसाठा पुन्हा कमी झाला होता. भंडारदरा धरण पुन्हा भरण्याच्या दिशेने आगेकुच करत असून ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता असणारे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ५८६ दशलक्ष घनफूट झाला होता. बाकी येथील लघुबंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला असुन कृष्णावती नदी ९७ क्युसेकने वाहत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News