Big Breaking News : मराठा समाजात ‘नो’ प्री वेडिंग शूटिंग ! पहा का आणि कधी झाला हा निर्णय ?

Ahmednagarlive24 office
Published:
Big Breaking News

Big Breaking News : परिस्थिती नसताना देखील कर्ज काढून प्री वेडिंग शूटिंगवर लाख रुपये खर्च केले जातात आणि वैयक्तिक खासगी फोटो सार्वजनिक करण्याची प्रथा रुढ झाली आहे.

याला कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून नगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह करताना प्री वेडिंग शूटिंग करू नये, असा ठराव केला. याशिवाय भविष्यात ‘एक गाव, एक विवाह ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचेही ठरले.

नगर जिल्हा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती चंद्रकांत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची दोन तीन दिवसांपूर्वी शहरात बैठक झाली. त्यात मराठा समाजाने प्री वेडिंग शूटिंगला समाजातील सर्वांनीच पायबंद घालावा, असा ठराव केला.

यावेळी सीए राजेंद्र काळे, शिवजीत डोके, डॉ. मोरे, किशोर मरकड, निखिल वारे, बाळासाहेब पवार हे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. या ठरावाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला दिले आहे. त्यामुळे समाजबांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता प्री वेडिंग शूटिंगला पायबंद घालावा,

असे आवाहन नगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. प्री वेडिंगचे छायाचित्रण करताना पैशांची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत असून आपल्या संस्कृतीच्या हे विरोधात आहे. त्यातून अनेक अनुचित प्रकार ही घडून येत आहेत. यामुळे मराठा समाजाने प्री वेडिंग शूटिंग पासून दूर राहावे, असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत गाडे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe