अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
माझी कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आली आहे, परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही.माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतोकी त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे ट्विट करत शरद पवारांनी केले आहे.
ओमायक्रॉनचा धोका असल्याने तिसऱ्या लाटेत खरबदारी म्हणून कोरोना नियमावली व निर्बंध आणखी कडक करण्यात आले.तिसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली,
पण बेडची गरज किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली नाही. त्यामुळे, विलिगीकरणात राहूनचा कोरोनावर अनेक नेत्यांनी मात केली आहे
राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेते करोनाबाधित आढळले होते. यात पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार,
राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील अशा अनेकांचा समावेश आहे. यातले काहीजण करोनामुक्त झाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम