अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार !

अहमदनगर शहरातील सदस्यांची अवस्था विकत आहे. याला राजकीय वरदहस्तातून मनपा अधिकारी, ठेकेदारांच्या संगममताने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

काळे यांनी ७७६ रस्त्यांच्या कामात नगर शासकीय तंत्रनिकेतनच्या नावे कामांचे गुणवत्ता टेस्ट रिपोर्ट,थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करण्यासाठी तंत्रनिकेतन, राजपत्रित अधिकारी यांच्या नावे बनावट शिक्के, लेटरहेड तयार करून रस्त्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अँटी करप्शनचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा धाडगे यांच्याकडे ऑनलाईन फिर्याद दाखल केली आहे.

निकृष्ट कामे करणारे बहुतांशी ठेकेदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप काळेंनी केला आहे. याबाबतची सविस्तर माहिती काळे यांनी काँग्रेसच्या शिवनेरी संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पुराव्यांची शेकडो कागदपत्र पत्रकारांना दाखवली.

काळेंनी फिर्यादीत आयुक्त पंकज जावळे यांच्यासह शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, सेवानिवृत्त शहर अभियंता सुरेश इथापे यांच्यासह ६ शहर अभियंते, बांधकाम विभागाचा चार्ज असणारे सात वर्षातील सर्व उपायुक्त, बांधकाम, लेखा विभागातील कर्मचारी, ठेकेदार, त्यांच्या संस्थांचे प्रोप्रायटर, भागीदार, ऑडिटर, शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर तसेच ज्या, ज्या शासकीय, निमशासकीय संस्था यांनी बनावट गुणवत्ता चाचणी अहवाल दिले,

त्या प्रक्रियेशी निगडित सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुद्ध सामूहिक संगनमत करत कट कारस्थान रचून रस्त्यांच्या कामात शासन व जनतेची फसवणूक करत भ्रष्टाचार केल्याची फिर्याद दिली आहे. मनपाच्या बांधकाम, पाणी पुरवठा, विद्युत, कचरा संकलन अशा विविध विभागांच्या कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेण्याची जबाबदारी शहर लोकप्रतिनिधी, नगरसेवकांची आहे. मात्र आपल्या बेरोजगार कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी त्यांच्या नावाने टेंडर मॅनेज करून दिले जातात. तीस ते शंभर टक्क्यांपर्यंत टक्केवारी घेतली जाते. निकृष्ट कामे कागदोपत्री जिरविण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केले जातात बिलं लाटली जातात.

या टक्केवारीतून कमावलेला पैसा विधानसभा, मनपा निवडणूकीत मतदारांना वाटण्यासाठी राजकीय नेतृत्व वापरते. रस्त्यांच्या दुरावस्थेला राजकीय नेतृत्व जबाबदार असून मतदारांनी आपण नेमके कुणाला निवडून देत आहोत याचा अंतर्मुख होत विचार करण्याची गरज असल्याचे मत काळ यांनी यावेळी व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe