मोठा निर्णय : अहमदनगर जिल्ह्यातील हजारो कुत्री, मांजरांचे होणार लसीकरण

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कुत्रा चावल्यानंतर रेबीज टाळण्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. हे इंजेक्शन बेंबीच्या खाली पूर्वी घ्यावे लागायचे. परंतु विज्ञानाने आता खूप प्रगती केली आहे. विविध लसी शोधून काढल्या आहेत. आता लशीचे प्रमाण आणि ठिकाणही बदलले आहे.

ते आता बेंबीजवळ दिले जात नाही. परंतु आता सरकारने कुत्र्यांनाच रेबीजप्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू केली आहे.

विसाव्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात ४८ हजार ६०० भटकी आणि २७ हजार ५८३ पाळीव कुत्री असल्याचीच माहिती आहे. मांजरांसह श्वानांना लसीकरण सुरु केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार १४ हजार २९९ प्राण्यांना लस देऊन झाली आहे. यात ५२६ मांजरे, तर ६ हजार ३५६ इतर प्राण्यांचा समावेश आहे. तर ६१ हजार ८८४ प्राण्यांना लस देणे बाकी असल्याचे समजते. श्‍वानांसोबत मांजरांनाही प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे.

भटक्या कुत्र्यांमुळे श्‍वानदंशाची शक्यता असते. पिसाळला कुत्रा असेल तर एखाद्याच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे या कुत्र्यांनाच रेबीज प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. प्रत्येक व्यक्ती अथवा जनावराला श्‍वानदंश होऊ न देणे, तो झाल्यास प्रथमोपचार घेत प्रभावी उपाययोजनेसाठी रेबीज रोगाविषयी जनजागृती केली जात असल्याचे , असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे यांनी सांगितले आहे.

तालुकानिहाय लसीकरण

तालुका श्वान मांजर

अकोले २७८ ३८

संगमनेर ५३८ ११५

राहुरी ५११ ३

राहाता ७५९ ३८

कोपरगाव ३८८ १९

श्रीरामपूर ५६८ १६

नेवासे ५८६ २६

पारनेर ३१५ २७

शेवगाव ३४३ ०

पाथर्डी २११ ११

कर्जत १३६९ १५९

श्रीगोंदे ३८८ ४६

जामखेड ७४५ २८

नगर ४१८ ०

एकूण १४,२९९

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe