शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : पुढील आठवड्यात तीन दिवस कांदा लिलाव राहणार बंद

Published on -

अहिल्यानगर : सध्या ग्रामीण भागातील शेतकरी कांदा काढणी करत असून तो लगेच बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. जरी भाव कमी असला तरी अनेकांना कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कांद्याची चांगली आवक होत आहे.

परंतु आता सलग तीन दिवस बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. मार्च एंड अर्थात सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाची अखेर असल्याने बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे नेप्ती उपबाजार समिती (कांदा मार्केट) येथील दि. २९, ३१ मार्च रोजीचे सर्व व्यवहार व कांदा लिलाव बंद राहणार आहेत. दि.१ एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्ववत चालू राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.

याबाबत अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडते असोसिएशनने बाजार समितीला तसेच जिल्हा हमाल पंचायत च्या अध्यक्षांना निवेदन देवून सन २०२५- २०२६ आर्थिक वर्ष अखेर असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे कांदा लिलावाच्या व्यवहारास अडचण येणार असल्याने,

तसेच राज्यातील इतर व परराज्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याने नेप्ती उपबाजार समिती (कांदा मार्केट) येथील दि. २९, ३१ मार्च रोजीचे व्यवहार व कांदा लिलाव बंद ठेवावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने कांद्याचे २ लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दि. २९ मार्च, ३१ मार्च रोजी कांदा विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीने केले आहे. तसेच दि.१ एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्ववत चालू राहतील असे बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे,उपसभापती रभाजी सुळ,सचिव अभय भिसे,सहा. सचिव संजय काळे यांनी कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe