मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आज फक्त एक रुग्ण, कुठे ते पहा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धडकी भरविणारी रुग्ण संख्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्यासाठी आज मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अवघा एक करोना रुग्ण आढळून आला आहे. अकोले तालुक्यात केलेले रॅपिड अँटीजेन चाचणीत हा एकमेव रुग्ण आढळून आला आहे.

अहमदनगर शहरासह इतर १३ तालुक्यांत आणि भिंगारमध्येही रुग्ण संख्या शून्यावर पोहचली आहे. केवळ अकोले तालुक्यात एक रुग्ण आढळून आला.

कोरोना आल्यापासून आतापर्यंतचा ही नीचांक आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार आपल्याला आता कोरोनासोबत जगावे लागणार असल्याने आकडा शून्यावर गेला तरीही तो कायम राहील, याची खात्री नाही.

त्यामुळे सध्याची स्थिती हीच करोनामुक्त मानली जात आहे. उचपाराधीन रुग्णांची संख्याही घटत असून गेल्या अनेक दिवसांपासून ही संख्या दोन अंकी आहे. मृत्यूचे प्रमाणही शून्यावर आले आहे.

सुमारे पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या नगर जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख, ९४ हजार ७६८ जाणांना करोनाची बाधा झाली. त्यातील ७ हजार २२५ जणांचा मृत्यू झाला. ३ लाख ८७ हजार ४६७ जणांनी कोरोनावर मात केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe