मोठी बातमी ! शिर्डीत साईंच्या मंदिरात रात्री 9 नंतर प्रवेश नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता राज्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिर्डी येथील साई मंदिराच्या नियमात बदल करण्यात आले आहे.(Shirdi Sai Temple)

यापुढे सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच मंदिरात प्रवेश असणार आहे. अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

दरम्यान शिर्डी साई संस्थानच्या वतीने साईदर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे.

यापुढे मंदिरात सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत दर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर, पहाटेच्या काकड आरतीत भाविकांना प्रवेश नसणार आहे.

मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत काकड व शेजारती पार पडणार आहे राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

त्यामुळे शिर्डी साई मंदिरामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News