Ahmednagar News : बिंगो जुगार पुन्हा सुरू ! युवा पिढी, या जुगाराच्या आहारी

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शेवगाव शहरात पुन्हा बिंगो जुगार सुरू झाला असून, युवा पिढी, या जुगाराच्या आहारी जात असल्याने पालक वर्ग हवालदिल झाला आहे, त्यामुळे शहरात काही ठिकाणी चालू झालेल्या बेकायदेशीर बिगो जुगाराची पोलिस अधिक्षक यांनी दखल घेण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात बंद असलेला बिंगो जुगार सुरू झाला आहे. या जुगाराने काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असताना आता पुन्हा एकदा शहरात हा जुगार सुरु झाल्याने तरुण पिढी त्याच्या आहारी जात आहे. या बिंगो जुगाराकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आणखीही काही ठिकाणी हा अनाधिकृत व्यवसाय सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीमध्ये झालेल्या दंगलीमुळे अनेक अनाधिकृत व्यवसाय बंद झाले होते.

या दंगलीनंतर शहरातील शांतता पूर्ववत होत असताना अनाधिकृत व्यवसायाने गेल्या दोन तीन महिन्यांपासून पुन्हा बस्तान मांडण्याचे काम सुरु केले आहे. त्यातच आता सहा ते सात ठिकाणी बिंगो जुगार हा तरुण पिढीला घातक ठरणारा बेकायदेशीर व्यवसाय सुरु झाल्याने पालक हवालदिल झाले आहेत. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी दखल घेण्याची मागणी होत आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe