भांडवलदारांचे हित जोपासणारी भाजप सरकार घटनेच्या विरोधात -संजय सपकाळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-देशात समता व स्वातंत्र्यता डॉ.बाबासाहेबांच्या घटनेने प्रस्थापित आहे. भांडवलदारांचे हित जोपासणारी भाजप सरकार घटनेच्या विरोधात कारभार करुन हुकुमशाही प्रस्थापित करीत आहे.

दीन, दलितांच्या उध्दारासाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य वेचले. या ज्ञानी व महामानवाची दखल संपुर्ण जगाने घेतली असून, त्यांचे कार्य एका समाजापुरते मर्यादीत नसून, युवकांनी त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याची भावना राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी व्यक्त केली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिंगार कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथील त्यांच्या पुतळ्यास भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सपकाळ बोलत होते. प्रारंभी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन भीम वंदना सादर करण्यात आली.

याप्रसंगी युवकचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, संभाजी भिंगारदिवे, जेव्हिअर भिंगारदिवे, अजय दिघे, सुरेश मेहतानी, रमेश वराडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, शिवम भंडारी, संपत बेरड, अजिंक्य भिंगारदिवे, मच्छिंद्र बेरड, अशोक भोसले, हंगारके सर, मंगेश मोकळ, अर्जुन बेरड, विशाल आण्णा बेलपवार, अक्षय भिंगारदिवे, गणेश बोरुडे, दिपक बडदे सदाशिव मांढरे, सिध्दार्थ आढाव, अशोक भिंगारदिवे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment