श्रीरामपूर येथील अशोक सहकरी साखर कारखान्याच्या नविन ६० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प, नविन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प तसेच नविन इन्सीनरेशन बॉयलर आदींचा उद्घाटन समारंभ
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तसेच कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
अशोक सहकारी साखर कारखान्याचे सध्या प्रतिदिन ४० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प तसेच प्रतिदिन ४० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित आहे.
सोमवार (दि. २६) सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर होणाऱ्या उद्घाटन समारंभास कारखान्याचे सभासद, शेतकरी, हितचिंतक, व्यापारी आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आणि संचालक मंडळाचे सदस्यांनी केले आहे.