भाजप नेत्यांनी स्पष्टच सांगितलं ! खा. सुजय विखेंमुळे अनेक विकास कामे…

Ahmednagar News

Ahmednagar News : रेल्वे स्टेशन रोड, गायके मळा ते लिंक रोडला जोडणाऱ्या व नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते झाले.

काही वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने नागरिकांनी होणाऱ्या अडचणीपासून सुटकेचा निश्वास सोडला असून, या रस्त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक थेट लिंक रोडला जोडला जाणार आहे.

भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर, विशाल खैरे व विजय गायकवाड यांनी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सदर रस्त्यासाठी पाठपुरावा करुन रखडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लावले.

रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी विजय गायके, सतीश भागवत, सुभाष चौभे, सचिन शहाणे, बालाजी काळे, अशोक काळे, ऋषभ गांधी, सुनील वैराळ, सुरेश नीरभवणे, रमाकांत दिवटे, भगवान घाटमाळ, खामकर, कर्ड, गांधी, पिंपळे, पूजा दिवटे, मोने ताई, गांधी मॅडम आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अॅड. आगरकर म्हणाले की, डॉ. सुजय विखे पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामे मार्गी लावण्यात आलेली आहेत. रेल्वे स्टेशन रोड परिसरातील विकास कामे त्यांच्या माध्यमातून होत आहे.

काही वर्षातच या परिसराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. अंतर्गत रस्त्यांचे काम मार्गी लावून व ओपन स्पेस विकसीत केले जाणार आहे. भाजपचे खासदार व पालकमंत्री यांनी शहरात विकासाची उपलब्धी करुन दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe