Ahilyanagar News:- नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले व राज्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार देखील स्थापन झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांना वेध लागले आहे की आता कुणाला मंत्रिपद मिळेल? कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही आमदारांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार असल्यामुळे कित्येक जणांच्या याबाबत अपेक्षा वाढल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर जर आपण श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणाहून विक्रमी असे मताधिक्य मिळवत भाजपचे विक्रमसिंह पाचपुते हे निवडून आले आहेत व हे एक युवा आमदार असून त्यांचा समावेश राज्य मंत्रिमंडळात करावा अशी अपेक्षा तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत.
कार्यकर्त्यांची ही अपेक्षा किंवा ही आशा असण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे विक्रमसिंह पाचपुते यांनी नुकतेच सांगितले की हा प्रश्न पक्ष श्रेष्ठींच्या कोर्टात आहे व गेल्या दोन दिवसापासून त्यांनी भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ आमदारांच्या भेटीसाठी घेतल्यामुळे श्रीगोंदेकरांना त्यांना मंत्रिपद मिळेल अशी एक आशा लागून आहे.
आमदार विक्रम पाचपुते यांना राज्यमंत्रिपद देण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विक्रम पाचपुते हे विक्रमी मताधिक्य मिळवत विजयी झाले व एक युवा आमदार म्हणून त्यांचा समावेश आता राज्य मंत्रिमंडळात करावा अशी अपेक्षा श्रीगोंद्यातील भाजप कार्यकर्त्यांना आहे व त्या प्रकारचे मागणी देखील त्यांनी केली आहे.
तसेच या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून विक्रमसिंह पाचपुते यांनी पक्षश्रेष्ठींसह काही वरिष्ठ आमदारांच्या भेटीसाठी घेतल्यामुळे देखील श्रीगोंद्याला मंत्रीपद मिळेल अशी एक अपेक्षा श्रीगोंदेकरांना लागून आहे.
जर आपण श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या 44 वर्षापासून सरकार विरोधी आमदार निवडून देणारा तालुका अशीच ओळख या मतदारसंघाने ठेवली आहे. परंतु तब्बल 44 वर्षानंतर ज्या पक्षाचे सरकार आहे त्याच पक्षाचा आमदार या मतदारसंघातून निवडून आला आहे व त्यामुळे या पार्श्वभूमीवर किमान त्यांना राज्यमंत्रीपद तरी मिळावे ही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
या ठिकाणाहून जर बघितले तर 60 ते 70 च्या दशकामध्ये बाबुराव बारसकर यांना मंत्रीपद मिळाले व त्यानंतर 1991 मध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे वडील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना स्व. सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री पद म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.
त्यानंतर 2004 ते 2009 या कालावधीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये बबनराव पाचपुते हे वनखात्याचे कॅबिनेट मंत्री होते 2009 ते 2013 पर्यंत ते आदिवासी विकास मंत्री देखील होते.
त्यानंतर मात्र श्रीगोंदे तालुक्याला मंत्रिपद मिळालेले नाही. आता तब्बल 37 हजारांचे मताधिक्य घेऊन पहिल्याच प्रयत्नात आमदार झालेले विक्रम सिंह पाचपुते यांना दक्षिणेतून मंत्रिपद देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर विक्रम पाचपुते यांनी देखील मुंबईत भेटीगाठी वाढवल्याचे चित्र असल्याने त्यांना मंत्रिपद मिळते का? हे येणाऱ्या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.