मुंबई-पुणे महामार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी आज ब्लॉक !

Published on -

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत पुणे वाहिनीवर मडप बोगदा व खालापूर टोल प्लाझा दरम्यान गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गुरुवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे.

या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.

मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (कार) शेडुंग फाटा येथून वळवून एन.एच. ४ जुना मुंबई-पुणे महामार्गावरून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉइंट कि.मी. ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News