शेत जमीन नसताना ऊस कारखान्यात आल्याचे भासवून बोगस बिले काढली…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- शेत जमीन नसतानाही नागवडे कारखान्यामध्ये नागवडे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ऊस गाळपाला आला होता.

त्याच्या पावत्या मिळाव्यात यासाठी गुलाब पवार (64, रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले मात्र आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे, स.म.शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2017-18 गाळप हंगामात नागवडे कारखान्याचे कार्यकारी संचालक,

शेतकी विभाग व कारखान्याचे संचालक मंडळ यांनी पृथ्वीराज नागवडे, दिग्विजय नागवडे यांच्या नावे मौजे मांडवगण फराटा, ता. शिरूर जि. पुणे, मौजे वाळकी ता. नगर या ठिकाणावरून शेत जमीन नसताना ऊस कारखान्यात गळपासाठी आला असे भासवून बोगस बिले काढण्यात आली.

दरम्यान याबाबत पवार यांनी कार्यकारी संचालक नागवडे कारखाना यांना ऊस वजनाच्या पावत्यांच्या नकला मिळण्यासाठी विनंती अर्ज केला होता.

वारंवार पाठपुरावा करूनही याची कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे पवार यांनी उपोषण सुरू केले. अखेर पवार यांना लेखीपत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe