अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे पुरुष प्रधान रुढी परंपरा मोडीत काढणारी अंत्ययात्रा पाहायला मिळाली. मुलगा नसल्याने सुखदेव गोविंद घुगे (वय ६५) यांना तीन मुलींनी खांदा देत मुखाग्नी दिला.
घुगे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंड व तीन भाऊ असा परिवार आहे. मुलगा नसल्याने पार्थिवास भावकीतील व्यक्ती व जावई खांदा देण्यास पुढे आले.
मात्र आयुष्यभर मायेची उब देणाऱ्या जन्मदात्या पित्याचे ऋण फेडणे शक्य नसल्याने अंतिम प्रवासात त्यांच्या पार्थिवाला खांदा देत मुलींनी पांग फेडले.
नातेवाईकांनी देखील रुढी परंपरेला फाटा देत या कार्याला संमती दर्शविली. मिना अंकुश सानप, सुनिता संतोष नागरे, काजल घुगे या तीन मुलींनी मुखाग्नी दिला.
शेडगावात ही परंपरा तीन उच्चशिक्षित बहिणींनी मोडीत काढल्याने त्यांचे कौतुक होत आहे. वडिलांनी मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही वडिलांनी आभाळाऐवढी माया केली.
मुलगा-मुलगी भेदभाव केला नाही. मुलगा नसल्याची खंत त्यांना वाटली नाही. वडिलांचे अंत्यसंस्कार आम्ही तीन बहिणींनी नातेवाईक व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून पूर्ण केले. पिडंदान विधी देखील आम्हीच करणार असल्याचे मीना सानप यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम