ब्रिटिशकालीन अहमदनगरचा रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट ! दौंड-मनमाड दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे, पहा एक स्पेशल रिपोर्ट

Published on -

अहमदनगरमध्ये अगदी ब्रिटिश काळापासून रेल्वेची सुविधा आहे. आता दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दरम्यान येणाऱ्या अहमदनगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट ठरणार आहे. याचे कारण असे दौंड-मनमाड दुहेरीकरणाचे काम आता पुर्णत्वाकडे आले आहे. याचे जवळपास ५६ टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के काम पूर्णत्वाच्या जवळ आलाय.

अहमदनगरच्या रेल्वे प्रवासात दौंड-मनमाड रेल्वे मार्ग हा अत्यंतर महत्वपूर्ण भूमिका बजावतो. दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पासाठी २ हजार ८१ कोटी खर्च नियोजित आहे. अद्याप १ हजार ६२४ कोटींचा निधी यासाठी खर्च झाला असून १३४ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे.

एक नजर प्रोजेक्टवर

मनमाड ते कान्हेगाव, विसापूर ते काष्टी, अकोळनेर ते सारोळा कासार, पुणतांबा ते पढेगाव हे
दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. निंबळक ते पढेगाव हे दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वाच्या जवळ आले आहे.
दौंड ते काष्टी, विसापूर ते सारोळा, अकोळनेर ते निबळक, कान्हेगाव ते पुणतांबा हे काम अद्याप प्रगतिपथावर आहे. प्रमुख पूल २८ असणार आहेत त्यापैकी १३ पूल पूर्ण झाले आहेत.

किती भूसंपादन होणार

रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम करण्यासाठी जवळपास ६८.१६४ हेक्टर भूसंपादन आवश्यक आहे. त्यापैकी १३. ५७ हेक्टर (१९ टक्के) भूसंपादन पूर्ण झाले आहे.

दौंड-मनमाड दुहेरीकरणाची लांबी

दौंड-मनमाड दुहेरीकरणाची लांबी २३६.६१ कि.मी. असून १३४.३१ किमी (५६ टक्के) काम पूर्ण झालेले आहे. ४८.२६ किमी (२० टक्के) काम पूर्णत्वाच्या जवळ आहे. ५४ किमी (२३ टक्के) काम प्रगतीपथावर आहे.

एक नजर पूर्ण झालेल्या कामांवर

अर्थवर्क ७५ टक्के, ब्लॅकेटिंग ६२ टक्के पूर्ण झाले आहे. २८ प्रमुख पुलांपैकी पैकी ११ पूल पूर्ण झाले आहेत. सिग्नलिंग नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम २७ टक्के तर सिग्नलिंग इनडोअर आणि आऊटडोअर कामे ३६ पैकी १६ म्हणजे ४४ टक्के पूर्ण झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News