अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील चास येथील घुंगार्डे वस्तीवर चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा दोन लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी सकाळी 10 ते साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी आनंदा बबन घुंगार्डे (वय 54 रा. घुंगार्डे वस्ती, चास, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घुंगार्डे यांच्या घराची आतून लावलेली कडी चोरट्यांनी हात घालून उघडली आणि आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून 2 लाख 32 हजार 600 रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम चोरून नेले.
या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नगर तालुका पोलिसांनी याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सानप हे करीत आहेत.