शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर ऊस जळून खाक

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे घडली आहे.

मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काही वेळानंतर आग विझवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत अधिक माहिती अशी कि, शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दशरथ पवार यांच्या रानातील ऊसाचे २ एकर क्षेत्र जळीत झाले.

शर्तीच्या प्रयत्नानंतर आग विझल्याने शेजारी असलेला १० एकरावरील ऊस आगीपासून बचावला. अंकुश देवकर व गितेश काशिनाथ पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली.

दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे आधीच बळीराजा भरडला जात असून यातच अस्मानी संकटामुळे देखील शेतकरी हतबल झाला आहे.

यातच संकटाचा पाढा अद्यापही पाठीशी कायम असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यातच महावितरणच्या चुकीचा भुर्दंड देखील सोसावा लागत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe