सोन्याच्या उधारीचे राहिलेले दोन लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून ते बुडविण्याच्या उद्देशाने सोने व्यापाऱ्याला त्रास दिला व काहीतरी द्रव पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
वाघोली (पुणे) येथील नितीन सुधाकरराव उदावंत, असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे. संशयित आरोपी ओम छगनराज टाक, प्रशांत छगनराज टाक दोघे रा. पाथर्डी, निलेश सुधाकर तीन माळवे.रा. गेवराई यांच्याविरुद्ध पोलिसांत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांत करण्यात आला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/08/dead-2-n_1588203647.jpg)
वाघोली येथील सोने व्यापारी नितीन उदावंत यांनी पाथडीच्या ओम टक व प्रशातं टाक यांना दोन लाख रुपयांचे सोने निलेश माळवे रा. गेवराईयांच्या मध्यस्तीने उधार दिले होते. उधारीचे पैसे मागायला आल्यानंतर उदावंत यांना टाक बंधू शिवीगाळ करीत असत.
दि. १६ मार्च २०२३ रोजी उदावंत पाथर्डीला टाक यांच्याकडे येऊन गेले होते. आठ दिवसानंतर पैसे देऊ असे त्यांना सांगितले. त्यानंतर दि.२५ मार्च रोजी उदावंत पाथर्डीला आले व टाक यांच्याकडे उधारीचे पैसे मागितले.
त्यावेळी त्यांना शिवीगाळ टाक व माळवे यांनी कोणेतरी द्रव पदार्थ सेवन करण्यास भाग पाडले. त्यानंतर उदावंत हे पुणे येथेएसटीने जात असताना करंजी घाटात त्यांना त्रास होऊ लागला. वाहकाने अँमुब्युलस बोलावली.
पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उदावंत यांना दाखल केले. त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. उदावंत यांनी पाथर्डीतून एसटीबसत बसल्यानंतर त्यांच्या फोनवरून नातेवाईकांना मॅसेज करून घटनेबाबत सांगितले होते.
तसेच काही नातेवाईकांना फोन करून हकिगत कळवबिलो होती. त्यानंतर त्यांचा पंधरा मिनिटांत मृत्यू झाला. उदावंत यांचे भाऊ यांनी पोलिसांत ओम छगनराज टाक, प्रशांत छगनराज टाक दोघे रा. पाथर्डी, निलेश सुधाकर माळवे. रा. गेवराई यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संगणमताने आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.