अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील रेणुकावाडी गावाजवळ सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबतची सविस्तर माहीती अशी की, महालक्ष्मी हिवरे येथुन गेल्या काही दिवसापासुन व्यवसाया निमित्त तिसगाव येथे स्थायीक झालेले दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड (वय ३७ वर्ष) हे सोमवारी रात्री मिरीकडे कामानिमित्त जात होते.

ते रेणुकावाडी गावाजवळ आले असताना त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरात धङक दिली. या अपघातामध्ये गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गायकवाड यांच्या अपघाती मृत्युमुळे तिसगावसह परिसरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe