पेटवले पाचरट मात्र चार एकर उसाचा झाला कोळसा!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- शेतातील ऊसाचा खोडवा पाचरट पेटवले होते. परंतु यात शेजारच्या दोन शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन एकर असा चार एकर ऊस जळला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील आंबी येथे घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील आंबी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकर मुरलीधर डुकरे यांच्या मालकीच्या शेतातील दोन एकर तर शेजारचे शेतकरी भागवत विश्राम साळुंके

यांचा दोन एकर असा एकून चार एकर तोडणीला आलेला ऊस जळाला. यावेळी नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाल्याने पुढील अनर्थ टळला; मात्र ड्डकरे व साळुंके यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेजारच्या शेतातील ऊसाचा खोडवा पाचरट जळाल्याने ही आग लागली असावी, असा स्थानिकांचा अंदाज आहे. कामगार तलाठी पारखे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News