Gold Buying Tips दिवाळीत सोने खरेदी करा, पण ‘या’ चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! होईल फायदा

Published on -

Gold Buying Tips:- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा आपल्या भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. दिवाळीच्या कालावधीमध्ये धनत्रयोदशीला आणि खास करून लक्ष्मीपूजन या दिवशी सोने आणि चांदी खरेदीला विशेष प्राधान्य दिले जाते. सध्या जर आपण सोने आणि चांदीचे दर पाहिले तर दरांनी गगनाला गवसणी घातली असून या वाढलेल्या दरांमुळे सोन्याची खरेदी कमी होईल अशी साधारण परिस्थिती होती. परंतु सोने आणि चांदीचे दर उच्चांकी पातळीवर असताना देखील मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीची खरेदी दिसून येत आहे. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील खूप गरजेचे असते. जेणेकरून मोठ्या प्रमाणावर पैसे जाऊन फसवणूक होणार नाही याची काळजी आपण स्वतःहून घेणे महत्त्वाचे असते.

दिवाळीत सोने आणि चांदी खरेदी करा, परंतु या गोष्टी लक्षात ठेवा

1- हॉलमार्कचा लोगो आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर तपासा- तुम्ही सोन्याची खरेदी करताना यामध्ये दागिने किंवा नाणी खरेदी करता तेव्हा हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी करावे. हॉलमार्क मध्ये देखील जो अस्सल हॉलमार्क असतो त्यामध्ये बीआयएस लोगो आणि सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असतो. जर दागिने हॉलमार्क नसलेले असतील तर ते खरेदीच्या वेळी स्वस्त असतात. परंतु त्या बदल्यात मात्र सराफ हे सोन्याच्या मूल्याच्या केवळ 80 टक्के हमी देतात. परंतु हॉलमार्क जर असले तर सोने खरेदी केल्यानंतर आणि त्याची विक्री केल्यानंतर त्याच्या किमतींची हमी दिली जाते.

2- या ॲपचा वापर करा- या क्षेत्रातील तज्ञ सांगतात की, आजकालच्या कालावधीमध्ये हेरिटेज ज्वेलरी तसेच पोल्की डिझाईनकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येते. मोती आणि रत्नांसह सोन्याचा वापर करून दागिने मोठ्या प्रमाणावर सध्या तयार केले जात आहेत. या अनुषंगाने जर तुम्ही सोने खरेदी केले तर बिलामध्ये सोन्याचे वजन आणि रत्नांची किंमत यांचा वेगवेगळा तपशील आहे का हे तपासून पाहणे खूप गरजेचे आहे. याकरिता तुम्ही ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डच्या अधिकृत असलेल्या ॲपवर तुमचा एचयूआयडी म्हणजेच हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन टाकून तुम्ही सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आणि डिझाईन तपासू शकतात.

3- अशा रीतीने मूल्याचा अंदाज बांधा- यामध्ये तज्ञ सांगतात की,सोन्याचे दर दररोज बदलत असतात. त्यामुळे सोने खरेदी करण्याअगोदर त्या दिवसाची किंमत काय आहे हे माहिती करून घ्यावे. 24 कॅरेट सोन्याच्या किमतीच्या आधारे उर्वरित कॅरेटची किंमत तुम्हाला काढता येते. उदाहरणच घ्यायचे झाले तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार प्रति दहा ग्राम आहे. तर एक कॅरेट सोन्याची किंमत 3250 असेल. आता तुम्हाला खरेदी करायचे असलेल्या कॅरेटच्या संख्येचा 3250 ने गुणाकार करावा. समजा तुम्हाला 22 कॅरेट सोने घ्यायचे असेल तर त्याकरिता 22 कॅरेट ची किंमत 3250×22=71500 रुपये असेल. यामध्ये मजुरी आणि तीन टक्के जीएसटी समाविष्ट नाही.

4- मजुरी आणि डिझाईन यांचा संबंध पाहणे- सोन्याच्या बाबतीत जे काही सराफाची मजुरी असते ती दागिन्यांच्या डिझाईन वर अवलंबून असते. डिझाईन बनवण्याकरिता दागिने पॉलिश केले जातात व ती पॉलिश करून नंतर मोल्ड केले जातात. यामध्ये एकूण सोन्याच्या वजनाच्या दोन ते दहा टक्के सोने वाया जाते. हे सोन्याच्या मूळ वजनामध्ये जोडून मजुरी निश्चित होते. त्यामुळे या गोष्टींकडे देखील लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe