Ahmednagar News : घाटमाथ्यावरील पाणी वळवून जिल्हा सुजलाम सुफलाम करणार – खा. लोखंडे

Published on -

Ahmednagar News : सर्व सामान्य जनतेने मला सुरुवातीला अगदी सतरा दिवसांमध्ये खासदार बनवले. त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. त्याचमुळे मी खासदारकीच्या माध्यमातून साईबाबांच्या आशीवादाने जनतेच्या हिताच्या कामांच्या संदर्भामध्ये आग्रही आहे. समन्यायी पाणी वाटपामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आहे.

निळवंडे धरणाच्या माध्यमातून कालवे सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे मात्र एवढ्यावरच न थांबता घाटमाथ्यावरील सुमारे ११० टीएमसी पाणी धरणांकडे वळवून संपूर्ण जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत, असे प्रतिपादन खा.सदाशिवराव लोखंडे यांनी केले.

खा. लोखंडे यांच्या माध्यमातून उत्तर नगरमधील विविध रस्त्यांना दहा कोटी ९१ लाखांचा निधी उपलब्ध करुण देण्यात आला. या सर्व कामांचे भूमिपूजन खा. लोखंडे यांच्या हस्ते देवळाली प्रवर चांदेगाव, टाकळीमिया येथे पार पडले.

यावेळी खा. लोखंडे यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे मला सहकार्य लाभत आहे.

मी केवळ खासदार निधी देऊन थांबली नाही. केंद्र व राज्याच्या माध्यमातून विविध निधी आणून या लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर कदम म्हणाले, खा. लोखंडे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. त्यांचे देवळाली प्रवरा शहरावर विशेष प्रेम आहे. त्यांच्या निधीच्या माध्यमातून देवळाली प्रवरा शहराला भरभरून मदत मिळत आहे. आमच्याकडून पाहिजे ते सहकार्य आम्ही त्यांना नक्कीच करू.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe