UnMarried Couple Rights : अविवाहित जोडप्यांसाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. जर तुम्हीही अविवाहित असाल आणि तुमच्या पार्टनरला ट्रीप साठी घेऊन जाण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची राहणार आहे. खरे तर अनमॅरीड कपलला म्हणजेच अविवाहित जोडप्यांना कुठे फिरायला जायचे असेल तर वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
एकतर भारतीय समाजात लग्नाआधी असे जोडप्याने फिरले तर लोक नावे ठेवतात, दुसरे म्हणजे अनेक ठिकाणी अविवाहित जोडप्यांना राहण्यासाठी रूम देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेकांच्या माध्यमातून अविवाहित जोडपे हॉटेलचे एका रूममध्ये राहू शकतं का ? याबाबत भारतीय कायद्यात काही तरतूद आहे का ? याविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते.

विशेष म्हणजे काहींनी तर अविवाहित जोडप्यांना भारतात भाड्याचे घर मिळू शकते का हा देखील सवाल उपस्थित केला होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नांच उत्तर अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून अविवाहित जोडप्यांना या नियमांची माहिती होईल आणि त्यांना येणारी अडचण दूर होईल.
अविवाहित जोडपं हॉटेलच्या एका रूममध्ये राहू शकत का?
याचे उत्तर आहे हो. अनेकदा असं पाहायला मिळतं की काही हॉटेल्स अविवाहित जोडप्यांना एक रूम देत नाहीत. मात्र कायद्यानुसार अविवाहित जोडप्यांना हॉटेल चालक रूम देण्यास मनाई करू शकत नाही. यासाठी मात्र अविवाहित जोडप्याकडे वॅलिड आयडी प्रूफ असायला हवा. विशेष म्हणजे दोघांकडे आयडी प्रुफ असणे बंधनकारक आहे.
तर दोघांकडे वॅलिड आयडी प्रूफ असेल तर कोणताच हॉटेलच्या रूम देण्यास मनाई करू शकत नाही. विशेष बाब म्हणजे जर एखाद्या हॉटेलच्या रूममध्ये अविवाहित जोडपे असेल आणि त्यांनी व्हॅलिड आयडी प्रूफ देऊन रूम बुक केलेला असेल तर पोलीस देखील त्यांना अटक करू शकत नाहीत. फक्त हॉटेलमध्ये रूमच नाही तर अविवाहित जोडप्यांना भाड्याने घर देखील घेता येऊ शकते.
अविवाहित जोडप्यांना भारतात कुठेही भाड्याने घर घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. अविवाहित जोडपे त्यांच्या ओळखीची कागदपत्रे देऊन आणि भाडे करार करून कोठेही भाड्याच्या घरात राहू शकतात. यासाठी मात्र योग्य आयडी प्रूफ सदर जोडप्याने घर मालकाला दिले पाहिजेत आणि रेंट एग्रीमेंट त्याला मराठीत भाडे करार म्हणतात ते देखील केले पाहिजे जेणेकरून त्यांना भविष्यात कोणतीच अडचण येणार नाही.