अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जतच्या प्रभाग क्र.१४ च्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवरांना कर्जत- जामखेडचे आ. रोहित पवार यांनी दबाव, दडपशाही व दादागिरी करून व आमिष दाखवून गैरप्रकाराने उमेदवारांवर दबाव टाकून राष्ट्रवादीत प्रवेश
करून घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने व इतर देखील वॉर्डमध्ये गैरप्रकाराने उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने राज्य निवडणूक आयुक्त यांना कर्जत नगरपंचायतची निवडणूक रद्द करण्यात यावी.(Ahmednagar Election)
अशी आज भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या वतीने तक्रार करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी दिली.
कर्जत तालुक्यात नगर पंचायतीच्या लढाईत भाजपाच्या प्रा राम शिंदे यांनी आ.रोहित पवार यांच्यावर जोरदार आरोपांच्या फैरी झाडत एकतर्फी वाटणारी लढत चुरशीची होणार आहे.
यामुळे ही निवडणूक फक्त जिल्ह्यातच गाजली नाही तर महाराष्ट्रात गाजली असून मूक आंदोलन, सभेतील आरोप प्रत्यारोप, कर्जतच्या जनतेतील शांतता,
विकासाची बाब बाजूला पडून वेगळेच मुद्दे चर्चेला येणे आशा अनेक कारणांमुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम