अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- आयपीएलचा थरार संपला कि लगेच टी 20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यातच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना देखील होणार असल्याने प्रेक्षक या सामन्याची वाट पाहात आहे. मात्र हा सामना होण्यापूर्वीच एक वाद उपस्थित झाला आहे. T20 वर्ल्ड कप मध्ये 24 ऑक्टोबर रोजी ‘हाय व्होल्टेज’ सामना म्हणजे भारत -पाकिस्तानचा सामना खेळवण्यात येणार आहे.
मात्र या सामन्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. खुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील हा सामना खेळण्यावर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले आठवले ?
काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधात भारतीय सैन्याची सुरू असलेली चकमक अद्यापही थांबलेली नाही. अशातच भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे अशी आम्ही केली आहे.
एवढंच नाही तर गरज पडल्यास भारताने पाकिस्तान सोबत युद्ध करावे अशीही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याची रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीमेवर सुरू असलेल्या गोळीबारामुळे 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे यामुळे रामदास आठवले यांनी पाकिस्तान वर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच पाकिस्तानवर आणखीन एक सर्जिकल स्ट्राइक करण्याची वेळ आली आहे आणि पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले यांच्या आधी एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी देखील हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी केली आहे.
पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असताना, भारतीय नागरिकांवर हल्ले करत असताना त्यांच्याशी सामना खेळणं चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम