सचिन कोतकरसह सहा जणांविरोधात गुन्हा ; हॉटेल व्यवस्थापकास शिवीगाळ,दमदाटी करत दिली जीवे मारण्याची धमकी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Breaking News :  सक्कर चौकातील हॉटेल यश पॅलेसचे व्यवस्थापक राकेशकुमार रामनारायण सिंग यांना शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सचिन भानुदास कोतकरसह इतर सहा जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात राकेशकुमार सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे की, सन २०२० पर्यंत सिंग हे कोतकर यांच्या सक्कर चौकातील उदयनराजे पॅलेस येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत होते.

सन २०२१ मध्ये सिंग हे समोरच्या यश पॅलेसमध्ये नोकरीसाठी गेल्यानंतर हॉटेलचे मालक सचिन कोतकर हे आमच्या हॉटेलसमोरील हॉटेलमध्ये नोकरी करू नकोस, इतर कोठेही काम कर अशी दमदाटी करीत. त्यासंदर्भात सिंग यांनी पोलीस अधीक्षकांकडे त्यावेळी तक्रारही दिली होती.

सिंग यांनी सचिन कोतकर यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर हॉटेल उदयनराजे पॅलेस येथील रोशनकुमार मिश्रा व त्याच्या साथीदारांनी यश पॅलेसचे कर्मचारी पिंटू विनोद सिंग यास मारहाण केली. त्यानंतर पिंटू सिंग यानेही पोलीसात तक्रार दिली होती.

त्यानंतर वेळोवेळी उदयनराजे पॅलेस येथील सुरज अप्पासाहेब शेळके, गणेश पांडूरंग सातपुते, सचिन पांडूरंग सातपुते यांना सचिन कोतकर हे राकेशकुमार सिंग यांच्याकडे पाठवून यश पॅलेसमध्ये काम करू नकोस असे सांगत.

दि.२ जुलै राजी रात्री १२ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास उदयनराजे पॅलेस हॉटेल येथील प्रिन्स याने राकेशकुमार यांना फोन करून शिविगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर हॉटेल यश पॅलेस बंद करून घरी जाताना सक्कर चौकात उदयनराजे पॅलेसमधील रोशनकुमार मिश्रा उर्फ राजनकुमार, प्रिन्सकुमार सिंग, निरजकुमार, अमन श्रीकांत सिंग, सुनीलकुमार सिंग, हनुमान रामदास झरेकर व आणखी ४ ते ५ अनोळखी इसम राकेशकुमार यांच्याजवळ आले. शिवीगाळ करीत तु यश पॅलेस येथे काम करू नकोस. तु येथून कुठेही जा असा दम देत तुला नगरमध्ये राहू देणार नाही, तुला जीवंत ठेवणार नाही अशी दमदाटी सचिन कोतकर याच्या सांगण्यावरून केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe