अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात 41 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू असून आता या ठिकाणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे केले आहे. यासाठी 31 जानेवारपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
आता जिल्हा पुरवठा विभाग जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रातील सीसीटी यंत्रणेची तपासणी करणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.

दरम्यान राज्य सरकारच्यावतीने गरजू, बेघर, स्थलांतरीत कामगार यांच्यासाठी शिवभोजन योजना सुरू केलेली आहे. यातच राज्यातील प्रत्येक शिवभोजन केंद्रात मानांकनानूसार सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश डिसेंबर 2021 मध्ये देण्यात आले होते.
यासाठी 31 जानेवारीपर्यंतची मदत देण्यात आली होती. नगर शहरात 17 आणि उर्वरित जिल्ह्यात 24 असे 41 शिवभोजन केंद्र जिल्ह्यात असून त्याठिकाणी 4 हजार 900 थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.
याठिकाणी गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने शिवभोजन केेंद्रात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकर जिल्ह्यातील केंद्राची तपासणी करण्यात येणार असल्याची
काय आहेत शासनाच्या सुचना?
जाणून घ्या शिवभोजन केंद्रात बसविण्यात येणारे सीसीटीव्ही यंत्रणेच्या कक्षेत केंद्राची सर्व जागा व्यापेल अशा पध्दतीने बसवणे.
मागील किमान दोन दिवसांच्या शिवभोजन आहार वाटपाचे प्रेक्षपण तपासणीसाठी उपलब्ध करून देणे.
वीज पुरवठा खंडीत होण्याच्या शक्यता विचारात घेवून पर्यायी व्यवस्था तयार ठेवणे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम